मतदार ओळखपत्र मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, जाणून घ्या सोप्या स्टेप्स (Digital Voter ID Card)

Digital Voter ID Card: नमस्कार! मतदान करण्यासाठी नागरिकांकडे मतदान कार्ड म्हणजेच ओळखपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला माहितच आहे की मतदानाच्या दृष्टिकोनातून मतदार ओळखपत्र हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. आज आपण मतदार ओळखपत्र कसे काढायचे आणि जर तुमच्याकडे आधीच मतदार ओळखपत्र असेल तर तुम्ही पीव्हीसी मतदार ओळखपत्र कसे ऑनलाइन डाउनलोड करू शकता.

याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हे मतदान ओळखपत्र तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या साहाय्याने खूप सोप्या पद्धतीने ऑनलाइन डाउनलोड करू शकता. मित्रांनो, आजच्या लेखात आपण या ओळखपत्राशी संबंधित सर्व महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून, लेख शेवटपर्यंत वाचा, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील.

New Digital Voter ID Card
New Digital Voter ID Card
Join Our WhatsApp Group Join Group!
Follow Our Instagram Page Follow Now!

मतदार ओळखपत्र कसे डाउनलोड करायचे

मित्रांनो मतदार ओळखपत्र हे डाऊनलोड करण्याकरिता तुम्हाला सर्वप्रथम भारत सरकारने तयार केलेल्या निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की हे मतदार ओळखपत्र तुम्ही अगदी विनामूल्य आणि सहज पद्धतीने डाऊनलोड करू शकता यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे देण्याची गरज नाही

पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मतदार ओळखपत्र कसे डाउनलोड करायचे याची प्रक्रिया सविस्तर पण याच जाणून घ्या भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरून मतदार ओळखपत्र डाऊनलोड करून तुम्ही त्याची प्रिंट देखील काढू शकता जसे की तुम्हाला माहिती आहे की मतदार ओळखपत्र हे फक्त मतदानासाठीच नाहीतर ते अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील वापरले जाते म्हणून मतदार ओळखपत्र हे भारतातील आवश्यक कागदपत्रात पैकी एक कागदपत्रे मानले जाते

मतदार ओळखपत्रासाठी पात्रता

  • मतदार ओळखपत्र बनवण्याची पहिली पायरी म्हणजे अर्ज करणे.
  • अर्ज करण्यासाठी तुम्हाला 18 वर्षे पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे.
  • मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी तुम्ही भारताचा मूळ नागरिक असला पाहिजे.
  • मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी काही विशिष्ट कागदपत्रे आवश्यक आहेत.
  • मतदार ओळखपत्र डाऊनलोड करण्यासाठी, वरील सर्व पात्रतांचे पालन करणे आवश्यक आहे.

एवढा पगार असेल तरच; बँक देणार पर्सनल लोन!

मतदार ओळखपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया

जर तुम्हाला मतदार ओळखपत्र डाउनलोड करायचे असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला भारत सरकारच्या निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सहजपणे हे मतदार ओळखपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट काढू शकता. मतदार ओळखपत्र कसे डाउनलोड करायचे याची सविस्तर माहिती आणि पायऱ्या खाली दिल्या आहेत. या पायऱ्यांचा वापर करून तुम्ही अगदी सहजपणे तुमचे नवीन मतदार ओळखपत्र डाउनलोड करू शकता.

  1. मतदार ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  2. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, तुम्हाला लॉग इन पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  3. तुमच्या यूजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा.
  4. “e Epic Download” पर्यायावर क्लिक करा.
  5. “Epic no” किंवा “फॉर्म संदर्भ क्रमांक” प्रविष्ट करा आणि तुमचे राज्य निवडा.
  6. OTP प्रविष्ट करा आणि पडताळणी करा.
  7. मतदार ओळखपत्र डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.
वोटर आयडी कार्ड अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
सर्व योजनांची सविस्तर माहिती मिळवायेथे क्लिक करा
Digital Voter ID Card

पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आता 75 हजार रुपयांची स्कॉलरशिप! 

तुमच्या मित्रांना ही पोस्ट नक्की शेअर करा
Rahul
Rahul

मी कृषी क्षेत्राशी संबंधित एक माहितीपूर्ण संसाधन आहे. माझा उद्देश शेतकऱ्यांपर्यंत शेतीच्या जुन्या आणि आधुनिक पद्धती, नवीन तंत्रज्ञान आणि माहिती पोहोचवणे हा आहे. मी तुम्हाला शेतीविषयक सर्व माहिती सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न करतो.

Articles: 18

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत