PM Kisan Yojana 20th Installment Date: देशातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये केली जाते. या योजनेअंतर्गत अलीकडेच २४ फेब्रुवारी २०२५ रोजी १९वा हप्ता जाहीर करण्यात आला होता, ज्या अंतर्गत ९.८ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली होती.
आता ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केली आहे, असे शेतकरी पीएम किसान योजनेच्या २० व्या हप्त्याची वाट बघत आहेत. तर, आता तुम्हीदेखील शेतकरी असाल आणि तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल, तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती देणार आहोत. तसेच, या हप्त्याची स्थिती कशी तपासायची हे पण आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
देशातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. तसेच हा हप्ता दर चार महिन्यांच्या अंतराने दिला जातो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. तसेच या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारने १९ हप्ते जमा केले असून आता २० व्या हप्त्याची तारीख देखील लवकरच जाहीर केली जाईल. तर हा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता कधी येणार याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात दिलेली आहे.
PM Kisan Yojana 20th Installment Date In Marathi
जसे की तुम्हाला माहिती आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नुकताच २४ फेब्रुवारी २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये १९ वा हप्ता जमा करण्यात आला. यानंतर आता शेतकरी २० व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. तर, आम्ही सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता प्रत्येक चार महिन्यांच्या अंतराने शासनाकडून दिला जातो.
अशा परिस्थितीत, पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता जून महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. परंतु, तोपर्यंत तुम्हाला थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल कारण सरकारकडून अद्याप कोणतीही नवीन अपडेट जाहीर करण्यात आलेली नाही. सरकारकडून कोणतीही अपडेट जाहीर झाल्यास, आम्ही तुम्हाला या वेबसाईटच्या माध्यमातून लवकरच कळवू.
पीएम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्यासाठी पात्रता काय आहे
- या योजनेचा लाभ फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.
- हा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या नोंदणीची पडताळणी करावी लागणार आहे.
- तसेच प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेचा हप्ता प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. आणि ही ई-केवायसी तुम्ही घरी बसून मोबाईलच्या मदतीने करू शकता.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरी करत नसावा, अन्यथा त्यांना लाभ मिळणार नाही.
- लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी सक्रिय करणे आवश्यक आहे. हे तुम्ही सीएससी सेंटरला भेट देऊन करू शकता.
PM Kisan Yojana 20th Installment Status
आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडून पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर झाल्यावर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंटची स्थिती तपासू शकता. याद्वारे तुम्हाला समजेल की ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये आली की नाही. आता स्थिती तपासण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्सचा वापर करा.
- सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
- त्यानंतर वेबसाईटच्या कॉर्नर येथील होम पेजवर तुम्हाला फार्मर कॉर्नर दिसेल, त्यावर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकून ‘गेट ओटीपी’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल जो तुम्हाला येथे टाकावा लागेल.
- यानंतर ‘सबमिट’ पर्यायावर क्लिक करा. हे सर्व करून झाल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंटची स्थिती उघडेल. अशा प्रकारे तुम्ही पी एम किसान योजनेच्या हप्त्याची स्थिती तपासू शकता.