PM Kisan सन्मान निधी योजना 2025: 20वा हप्ता तारीख, पात्रता, e-KYC अपडेट व सर्व माहिती

PM Kisan 20th Installment Date: बरेच शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २०व्या हप्त्याची वाट बघत आहेत. शेतकरी मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच येणार आहे. पी.एम. किसान योजनेअंतर्गत दरवर्षी कोट्यवधी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

ही मदत दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील हप्त्याची रक्कम थेट डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे हस्तांतरित केली जाते.

केंद्र सरकारमार्फत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण 19 हप्ते जमा करण्यात आले आहेत. म्हणूनच सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आता पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याकडे लागले आहे. अनेक शेतकऱ्यांना आशा होती की हा हप्ता जून महिन्याच्या शेवटपर्यंत येईल, परंतु तसे झाले नाही. आणि महत्त्वाचे म्हणजे, जुलै महिना सुरू झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे—पी.एम. किसान योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 20वा हप्ता कधी येणार?

PM Kisan 20th Installment Date
PM Kisan 20th Installment Date

PM किसान योजना म्हणजे काय?

पी. एम. किसान योजनेमार्फत गरजू आणि गरीब शेतकऱ्यांना दरवर्षी 6000/- हजार रुपये दिले जातात. ही रक्कम प्रत्येकी 2000/- हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट डीबीटीमार्फत लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा खर्च भागवण्यासाठी तसेच कुटुंबाच्या उत्पन्नाला हातभार लावण्यासाठी मदत होते.

20वी हप्त्याची तारीख 2025 मध्ये केव्हा येणार?

प्रसारमाध्यमांच्या बातम्यांमध्ये असे सांगितले जात आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता तुम्हाला जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मिळू शकतो. परंतु शेतकरी मित्रांनो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे की सरकारने अद्याप या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्याआधी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सविस्तर माहिती मिळवा.

PM Kisan चे हप्ते किती व कोणत्या तारखेला मिळाले

हप्त्याचा क्रमांकहप्ता जमा होण्याची तारीख
२० वा हप्ताजुलै पहिला किंवा शेवटचा आठवडा , २०२५ (अपेक्षित)
१९ वा हप्ता२४ फेब्रुवारी २०२५
१८ वा हप्ता५ ऑक्टोबर २०२४
१७ वा हप्ता१८ जून २०२४
१६ वा हप्ता२८ फेब्रुवारी २०२४
१५ वा हप्ता१५ नोव्हेंबर २०२३
१४ वा हप्ता२७ जुलै २०२३
१३ वा हप्ता२७ फेब्रुवारी २०२३
१२ वा हप्ता१७ ऑक्टोबर २०२२
११ वा हप्ता१ जून २०२२
१० वा हप्ता१ जानेवारी २०२२
९ वा हप्ता१० ऑगस्ट २०२१
८ वा हप्ता१४ मे २०२१
७ वा हप्ता२५ डिसेंबर २०२०
६ वा हप्ता९ ऑगस्ट २०२०
५ वा हप्ता२५ जून २०२०
४ था हप्ता४ एप्रिल २०२०
३ रा हप्ता१ नोव्हेंबर २०१९
२ रा हप्ता२ मे २०१९
१ ला हप्ता२४ फेब्रुवारी २०१९
All PM Kisan Installment Release Dates 2025

e-KYC अनिवार्य का आहे?

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी, तसेच योग्य लोकांपर्यंत आर्थिक मदत पोहोचते आहे की नाही याची खात्री करण्यासाठी, पीएम किसान योजनेत ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. नॅशनल पोर्टल ऑफ इंडिया नुसार, जर शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नसेल, तर त्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणारा लाभ थांबू शकतो.

ही ई-केवायसी ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही प्रकारांनी करता येते. ऑनलाइन ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना नॅशनल पोर्टल ऑफ इंडिया या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागते. तेथे शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आणि ओटीपी प्रविष्ट करावा लागतो.

हे पण वाचा : केंद्र योजना PM किसान अ‍ॅपद्वारे E-KYC प्रक्रिया

पीएम-किसान योजनेची माहिती

वैशिष्ट्य तपशील
हप्त्याचा क्रमांक २० वा हप्ता (20th Installment)
योजनेचे नावपीएम किसान २० वा हप्ता
सुरू केली भारत सरकार
सुरू झाल्याची तारीख २४ फेब्रुवारी २०१९
उद्देशेतकऱ्यांना आर्थिक मदत
पात्रता लागवडीयोग्य जमीन असलेले भारतीय शेतकरी
प्रत्येक हप्त्याची रक्कम रु. २,०००
वार्षिक लाभ रु. ६,००० (३ हप्ते)
अर्ज कसा करावा अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाईन
आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, बँक खात्याचे तपशील
अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/
हेल्पलाईन १५५२६१ / ०११-२४३००६०६
PM-Kisan yojana details

पीएम किसान योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी पात्रता

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ फक्त अशा शेतकऱ्यांनाच मिळतो जे भारताचे नागरिक आहेत आणि शेतजमिनीचे मालक आहेत. यासोबतच, त्यांचा आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी जोडलेला असावा आणि त्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असावी. मात्र, जे शेतकरी आयकर भरतात किंवा सरकारी/निमसरकारी नोकरीत आहेत, असे शेतकरी या योजनेसाठी पात्र मानले जात नाहीत.

पीएम किसान २० व्या हप्त्याच्या पेमेंटची स्थिती ऑनलाइन तपासा

  • पीएम किसान पेमेंट स्टेटस तपासण्यासाठी अधिकृत पीएम किसान वेबसाइटला भेट द्या.
  • आता “Know Your Status” वर क्लिक करा.
  • तुमचा नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड एंटर करा, नंतर “Get OTP” वर क्लिक करा.
  • तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी एंटर करा आणि नंतर तुमची पेमेंट स्टेटस तपासा.

तुमच्या पीएम किसान २० व्या हप्त्याच्या अर्जाची स्थिती कशी तपासायची?

  • अधिकृत वेबसाइटवर जा.
  • होमपेजवरील “Farmers Corner” वर क्लिक करा.
  • पर्यायांमधून “Know Your Status” निवडा.
  • तुमचा अर्ज क्रमांक आणि कॅप्चा कोड एंटर करा.
  • “Get OTP” वर क्लिक करा आणि तुमच्या मोबाईलवर पाठवलेला ओटीपी एंटर करा.
  • तुमच्या तपशीलांची पुनरावलोकन करा आणि तुमची स्थिती पाहण्यासाठी “Search” दाबा.

पंतप्रधान किसान अपात्र यादी

  • संस्थात्मक जमीनदार.
    सरकारी सेवेत असलेले किंवा कायदेशीर पदांवर असलेले शेतकरी किंवा कुटुंबातील सदस्य.
  • सध्याचे किंवा माजी खासदार/आमदार/स्थानिक संस्था प्रमुख जसे की महापौर किंवा जिल्हा पंचायत प्रमुख.
  • गेल्या आर्थिक वर्षात आयकर भरलेले कुटुंब.
  • निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना ₹१०,००० पेक्षा जास्त मासिक पेन्शन मिळते (वर्ग चतुर्थ/गट ड वगळता).
  • डॉक्टर, अभियंते, वकील किंवा आर्किटेक्ट सारख्या व्यावसायिक पदवी धारकांची कुटुंबे.

Contact Information (Helpline)

Phone: 155261 or 011-24300606

FAQs

पीएम किसान २० व्या हप्त्याची तारीख कधी अपेक्षित आहे?

पी एम किसान चा 20 वा हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा शेवटच्या आठवड्यात जमा केला जाऊ शकतो

पी एम किसान योजना ही कधी सुरू करण्यात आली

ही योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आली

प्रत्येक हप्त्याला किती रक्कम दिली जाते?

पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा केले जातात

Swaraj
Swaraj

मी स्वराज देशमुख, गेल्या सहा वर्षांपासून ब्लॉगिंग आणि लेखन क्षेत्रात सक्रिय आहे. माझं मुख्य लक्ष सरकारी योजना, शासकीय कर्ज योजना, तसेच सामान्य लोकांच्या दैनंदिन उपयोगी माहितीवर केंद्रित आहे. मी लेखांमधून फक्त माहिती देत नाही, तर लोकांच्या अडचणी समजून घेऊन, त्यावर योग्य मार्गदर्शन व उपाय देण्याचा प्रयत्न करतो. माझं लिखाण हे सरकारी GR, अधिकृत माहिती स्त्रोत, आणि प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित असतं. माझं उद्दिष्ट म्हणजे – सामान्य माणसाला योजनांचा योग्य लाभ मिळवून देणं, प्रक्रियांमधील गुंतागुंत समजावून सांगणं, आणि त्यांना स्वतःच्या हक्कासाठी सजग करणं.

Articles: 26

One comment

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत