लाईट बिल स्वस्त! ₹120 ची सूट मिळवा, लगेच करा नोंदणी – Mahavitaran Go-Green Yojana

Mahavitaran Go-Green Yojana: नमस्कार मित्रांनो, महावितरण तर्फे “गो ग्रीन” नावाची एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून, ग्राहकांना त्यांच्या वीज बिलावर ₹120 पर्यंत सवलत मिळणार आहे. जर तुम्हाला या योजनेमध्ये सहभागी व्हायचा असेल तर, आजच्या लेखामध्ये तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल. महावितरणने असे म्हटले आहे की “गो ग्रीन” योजना ही काळाची गरज आहे. वीज ग्राहकांना या योजनेत सहभागी होऊन पर्यावरण रक्षणात योगदान देण्याची उत्तम संधी आहे.

Mahavitaran Go-Green Yojana In Marathi

मित्रांनो, सध्याच्या काळात आपण बरीच कामे आपल्या मोबाईलद्वारे करत असतो. जसे की, मोबाईल रिचार्ज करणे, बँकेचे पैसे भरणे, एकमेकांना ऑनलाइन पैसे पाठवणे आणि विजेचे बिल भरणे यासह अनेक गोष्टी आपण सहजपणे करू शकतो. यामुळे आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. बरेच लोक मोबाईलच्या माध्यमातून विजेचे बिलही भरतात. तरीही, त्यांच्या घरी दर महिन्याला कागदी विजेचे बिल येते. आणि अनेकदा आपण ते पाहत नाही कारण आपल्याला आधीच मोबाईलवर विजेच्या बिलाचा मेसेज आलेला असतो आणि आपण ते लगेच भरतो.

Mahavitaran Go-Green Yojana
Mahavitaran Go-Green Yojana

तुम्हाला माहिती आहे का, महावितरण कंपनी दर महिन्याला आपल्या ग्राहकांना छापलेले बिल देते? या छापलेल्या बिलांसाठी महावितरणला दर महिन्याला लाखो रुपये खर्च करावा लागतो. प्रत्येक छपाईसाठी दोन रुपये इतका खर्च येतो आणि कागदाचाही अपव्यय होतो. ग्राहकांनी कागदी बिल नाकारावे आणि एसएमएस, ई-मेलद्वारे पाहून ऑनलाईन विजेचे बिल भरावे यासाठी महावितरण कंपनीने “नो पेपर बिल” नावाची योजना सुरू केली आहे.

लाईट बिलावर मिळवा 120 रुपये सूट

महावितरण कंपनीच्या ग्राहकांनी छापील विज बिल नाकारून ईमेलद्वारे किंवा एसएमएसद्वारे बिलाची माहिती घेऊन ते भरल्यास, त्यांना दर महिन्याला दहा रुपयांची सवलत महावितरण कंपनीकडून दिली जाते. म्हणजेच, आता ग्राहकांना प्रत्येक वर्षी 120 रुपयांचा फायदा होतो. यासोबतच, महावितरण कंपनीलाही कागदाच्या खर्चात तोच रुपयाची बचत होते.

आता तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि तुमचे पैसे वाचवायचे असतील तर, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अगदी सहज पद्धतीने “गो ग्रीन” योजनेसाठी अर्ज करू शकता.

हे नक्की वाचा: महाराष्ट्रातील मुलींना मिळणार 1.50 लाख रुपये, अर्ज झाले सुरू! Sukanya Samriddhi Yojana Application Form

गो ग्रीन साठी अर्ज कसा करावा?

आता तुम्हालाही महावितरणने सुरू केलेल्या गो ग्रीन योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास, तुम्ही तुमच्या जवळच्या वीज बिल भरणा केंद्राला भेट देऊ शकता किंवा तुम्ही ऑनलाइन पद्धतीनेही या योजनेसाठी अर्ज करू शकता. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला महावितरणच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन विचारलेली माहिती गो ग्रीन अर्जामध्ये भरावी लागेल आणि सबमिट करावी लागेल. काही तासांमध्येच तुमची गो ग्रीन सुविधा सुरू होईल आणि तुमच्या वीज बिलावर दर महिन्याला दहा रुपयांची, तसेच वर्षाला 120 रुपयांची बचत होईल.

गो ग्रीन सुविधा सुरू कराhttps://pro.mahadiscom.in/Go-Green/gogreen.jsp
HOME PAGESHETIKHAJANA.COM
Swaraj
Swaraj

नमस्कार! मी स्वराज आहे. मी माझे इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे आणि मला भारत सरकारच्या नवीन सरकारी योजनांबद्दल माहिती घेण्याची विशेष आवड आहे. या माहितीचा उपयोग करून, मी तुम्हाला "शेती खजाना" द्वारे भारत सरकारच्या विविध सरकारी योजनांबद्दल सविस्तर माहिती देतो. तसेच, तुम्हाला सरकारी योजनांशी संबंधित अधिक सविस्तर माहितीसाठी, तुम्ही माझे सोशल मीडिया अकाउंट फॉलो करू शकता.

Articles: 17

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *