(Live) Maharashtra SSC Result 2025 – महाराष्ट्र 10वीचा निकाल जाहीर! mahresult.nic.in

Maharashtra SSC Result 2025: महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मागील २१ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५ या कालावधीत घेतल्या होत्या. तसेच ही परीक्षा देण्यासाठी १६ लाख विद्यार्थी होते. आता परीक्षेनंतर सर्व विद्यार्थी हे २०२५ च्या दहावी बोर्डाचा निकाल कधी प्रकाशित होईल याची वाट पाहत आहेत. तर, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की Maharashtra SSC Result 13 मे 2025 रोजी दुपारी 01 वाजता जाहीर होणार आहे . तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार त्याचा निकाल अगदी सहज पद्धतीने तपासू शकतील. हा निकाल तुम्हाला तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव वापरून तपासता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, दहावीचा निकाल तपासण्याची प्रक्रिया काय आहे तसेच ग्रेडिंग सिस्टीम आणि निकालाशी संबंधित सविस्तर माहिती आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Maharashtra SSC Result 2025
Maharashtra SSC Result 2025

Maharashtra SSC Result 2025 In Marathi – Highlights

इयत्ता१०वी (Maharashtra SSC Result 2025)
विद्यार्थ्यांची संख्यासुमारे १६ लाख
लेखाचे नावमहाराष्ट्र एसएससी निकाल २०२५
लेख श्रेणीनिकाल लाईव्ह
महाराष्ट्र एसएससी परीक्षेची तारीख२१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५
महा एसएससी निकाल जाहीर होण्याची तारीख13 मे 2025 ( दुपारी 01 वाजता)
निकाल मोडऑनलाइन
अधिकृत वेबसाइटmahahsscboard.in
महाराष्ट्र एसएससी परीक्षा २०२५

Maharashtra SSC Result 2025 Release Date In Marathi

विद्यार्थी मित्रांनो, Maharashtra SSC Result 2025 आयोजित होऊन बराच काळ झाला आहे आणि आता सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेचा निकाल कधी जाहीर होईल, यासोबतच परीक्षेच्या निकालाची तारीख आणि वेळ जाणून घेण्याची आतुरता आहे. त्यामुळे त्या सर्व उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मंडळाकडून 13 मे 2025 रोजी महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीचा निकाल जाहीर होणार असे जाहीर करण्यात आले आहे, तसेच हा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे. तसेच, मंडळाने निकाल जाहीर करण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत सूचना दिली नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला www.mahahsscboard.in भेट देऊन निकालाशी संबंधित सर्व अपडेट्स अगदी सहज पद्धतीने जाणून घेऊ शकता.

Maharashtra Board 10th Result 2025 Download Link In Marathi

विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल पूर्णपणे जाहीर झाल्यानंतर निकाल तपासण्यासाठी आणि गुणपत्रिका डाउनलोड करण्याकरिता थेट लिंक महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटद्वारे प्रसिद्ध केली जाईल. निकाल तपासण्यासाठी थेट लिंक जारी केल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे मोबाईल किंवा लॅपटॉप वापरून या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. त्यानंतर तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव वापरून तुम्ही अगदी सहज पद्धतीने महाराष्ट्र एसएससी बोर्डाने प्रसिद्ध केलेला निकाल बघू शकता. आता हा दहावी बोर्डाचा निकाल कसा बघायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती आम्ही तुम्हाला खाली दिली आहे. तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर आम्ही तुम्हाला या निकालाची थेट लिंक देखील देऊ, जेणेकरून तुम्ही त्या लिंकचा वापर करून अगदी सहज पद्धतीने तुमचा निकाल तपासू शकाल.

(Live Link) Maharashtra SSC Result 2025

https://mahahsscboard.in/mrhttps://sscresult.mahahsscboard.in/
https://mahresult.nic.in/https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mkcl.org/

Maharashtra Board 10th Grading System 2025 In Marathi

MarksGrade Name
75% and aboveDistinction
60% to 74%1st Division
45% to 59%2nd Division
35% to 44%Pass Grade
Below 35%Fail
Maharashtra Board 10th Grading System 2025

How To Check & Download Maharashtra Board SSC 10th Result 2025

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in वर जा.
  2. निकालाची लिंक पहा: “महाराष्ट्र एसएससी निकाल २०२५” या लेबल असलेल्या लिंकवर क्लिक करा.
  3. आवश्यक माहिती प्रविष्ट करा: तुमच्या प्रवेशपत्रावर नमूद केल्याप्रमाणे तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करा. जर आईचे नाव नमूद केले नसेल तर ‘XXX’ प्रविष्ट करा.
  4. माहिती सबमिट करा: “निकाल पहा” बटणावर क्लिक करा.
  5. पहा आणि डाउनलोड करा: तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल. भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रत डाउनलोड करा आणि प्रिंट करा.

MAHA SSC Result 2025 – FAQ’s

महाराष्ट्र एसएससी निकाल २०२५ कधी जाहीर होईल?

महाराष्ट्र राज्य मंडळ १३ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता दहावीचा निकाल जाहीर करेल.

महाराष्ट्र बोर्डाचा १०वीचा निकाल २०२५ कुठे पाहायचा?

MAHA SSC 10वी निकाल 2025 जाहीर झाल्यानंतर, तुम्ही mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुमचा निकाल तपासू शकाल.

महाराष्ट्र एसएससी परीक्षा २०२५ उत्तीर्ण होण्यासाठी किमान उत्तीर्ण गुण किती आहेत?

३५% पेक्षा जास्त गुण

हे पण वाचा: 10वीची Original Marksheet डाउनलोड करा! संपूर्ण माहिती

Swaraj
Swaraj

Hello! I’m Swaraj, an engineering graduate passionate about exploring new government schemes in India. Through "Sheti Khajana," I provide detailed information on various initiatives. For more updates, feel free to follow me on social media.

Articles: 32

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *