बांधकाम कामगारांना सरकार देणार, दरमहा 3000 हजार रुपये! E-Shram Card Pension Yojana 2024

E-Shram Card Pension Yojana: नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारकडून तसेच केंद्र सरकारकडून बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे ई-श्रम कार्ड पेन्शन योजना. या योजनेअंतर्गत, बांधकाम कामगारांचे वय 60 वर्षे पूर्ण झाल्यास, बांधकाम कामगारांना केंद्र सरकारकडून दर महिन्याला तीन हजार रुपयांचे पेन्शन दिले जाते. यामुळे त्यांच्या वृद्धापकाळात त्यांना कोणत्याही प्रकारचे काम न करता अगदी आरामदायी जीवन जगता येते. तसेच, साठ वर्षांचे झाल्यानंतर त्यांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडत नाही आणि ते स्वतःच्या हिमतीवर स्वतःचा खर्च भागवू शकतात.

यासोबतच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व मजुरांना ईश्रम कार्ड पेन्शन योजनेचा लाभ केंद्र सरकारद्वारे दिला जातो. अशा परिस्थितीत जर तुम्ही देखील श्रम कार्ड धारक असाल किंवा मजूर असाल, तर तुम्हाला या योजनेचा अर्ज करून सहजपणे लाभ घेता येतो. या योजनेअंतर्गत अर्ज करून तुम्ही सरकारकडून दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन अगदी सहजपणे मिळवू शकता, जे की तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. तर आज आपण या लेखाद्वारे या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यात आपण ही श्रम कार्डासाठी अर्ज कसा करायचा, ईश्रम कार्डची पात्रता काय आहे, यासोबतच अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत, ही सविस्तर माहिती आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

E-Shram Card Pension Yojana In Marathi

तुम्हा सर्वांना माहिती असेलच की, आपल्या भारत देशामध्ये असे लाखो करोडो मजूर असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात. तर आता, या काम करणाऱ्या मजुरांसाठी केंद्र सरकार मार्फत ही ई-श्रम कार्ड पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. जर आता तुमच्याकडे देखील लेबर कार्ड असेल आणि तुम्ही देखील मजूर असाल, तर तुम्ही या ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेचा लाभ अगदी सहज घेऊ शकता. ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेअंतर्गत तुम्हाला दर महिन्याला केंद्र सरकार मार्फत तीन हजार रुपयांची रक्कम पेन्शनच्या स्वरूपात घेता येते. या योजनेअंतर्गत दिले जाणारे पेन्शन बांधकाम कामगारांना साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळते.

E-Shram Card Pension Yojana
E-Shram Card Pension Yojana

जर आता तुम्हाला ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेअंतर्गत दर महिन्याला पेन्शन मिळवायचे असेल, तर तुम्हाला श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत नोंदणी करावी लागेल. यानंतरच तुम्ही या ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकता. याशिवाय, जर तुम्हाला साठ वर्षानंतर दर महिन्याला तीन हजार रुपयांची रक्कम पेन्शनच्या स्वरूपात मिळवायची असेल, तर तुम्ही ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेअंतर्गत 55 ते 200 रुपये पर्यंतचे प्रीमियम भरू शकता. यामुळे, तुम्हाला साठ वर्षे झाल्यानंतर तीन हजार रुपयांची रक्कम महिन्याला मिळेल.

E-Shram Card Pension Yojana 2024 Overview In Marathi

योजनेचे नावई-श्रम कार्ड पेन्शन योजना
सुरुवातकेंद्र सरकारकडून
लाभार्थीबांधकाम कामगार
आर्थिक सहाय्य३००० हजार रु.
नोंदणीऑनलाइन
योजना प्रकारकेंद्र सरकार योजना
अधिकृत वेबसाइटeshram.gov.in
E-Shram Card Pension Yojana

Main objective of E-Shram Card Pension Yojana In Marathi

तर, आता तुम्हाला देखील ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेकरिता अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला योजनेसाठी लागणारे पात्रता तसेच कागदपत्रे माहिती असणे आवश्यक आहे. ती असल्यास, तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकता.

तर, सर्वप्रथम ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही मूळ भारताचे रहिवासी असणे आवश्यक आहे. यासोबतच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या रहिवाशांनाच या योजनेचा लाभ दिला जातो. तसेच लाभ घेणाऱ्या बांधकाम कामगाराची मासिक उत्पन्न मर्यादा पंधरा हजारापेक्षा कमी असावी. जर त्याची उत्पन्न मर्यादा १५,००० पेक्षा जास्त असेल, तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. यासोबतच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे तसेच ४० वर्षांपेक्षा कमी असावे. तर, आता जर तुम्ही शासनाने दिलेल्या सर्व पात्रतांचे पालन करत असाल, तर तुम्ही या योजनेचा लाभ अगदी सहजरित्या घेऊ शकता.

E-Shram Card Pension Yojana Documents

केंद्र शासनाने सुरू केलेल्या ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेचा अर्ज करून, तुम्हाला जर दर महिन्याला तीन हजार रुपये रक्कम मिळवायची असेल तर, तुम्हाला खाली दिलेल्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकता.

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • ई-श्रम कार्ड
  • बँक खाते विवरण
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

How To Apply For E-Shram Card Pension Yojana In Marathi

तर मित्रांनो, आता तुम्हाला देखील ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही आता घरी बसून अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईल द्वारे अर्ज करू शकता. तर हा अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. या माहितीच्या आधारावर तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता.

  • तर आता सर्वात आधी तुम्हाला ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी केंद्र शासनाच्या रोजगार मंत्रालयातील अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. ही वेबसाईट ओपन करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल, कम्प्युटर किंवा टॅबलेटचा वापर करू शकता.
  • यानंतर maandhan.in या पेजवरती क्लिक करा.
  • आता या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला वेबसाईटच्या पेजवरती “येथे क्लिक करा” हा पर्याय दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुमच्यासमोर “सेल्फ रजिस्ट्रेशन” हा पर्याय येईल. येथे तुम्हाला क्लिक करून ई-श्रम कार्ड योजनेचा फॉर्म उघडायचा आहे. तर आता हा फॉर्म काळजीपूर्वक भरा. फॉर्ममध्ये दिलेली आवश्यक कागदपत्रे तुम्हाला वेबसाईटमधील “अपलोड करा” या बटनावरती क्लिक करून सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • आता ही सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आणि फॉर्म भरून झाल्यानंतर, तुम्हाला हा फॉर्म “सबमिट” पर्यायावर क्लिक करून सबमिट करायचा आहे. अशा रीतीने तुमचा फॉर्म संपूर्ण भरल्या जाईल. आता फॉर्म चेक झाल्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे ठरवल्या जाईल. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला दरमहा तीन हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
ई-श्रम कार्ड पेन्शन योजनाअधिकृत वेबसाइट
सर्व सरकारी योजनांची माहितीहोम पेज
E-Shram Card Pension Yojana
ShetiKhajana
ShetiKhajana

मी कृषी क्षेत्राशी संबंधित एक माहितीपूर्ण संसाधन आहे. माझा उद्देश शेतकऱ्यांपर्यंत शेतीच्या जुन्या आणि आधुनिक पद्धती, नवीन तंत्रज्ञान आणि माहिती पोहोचवणे हा आहे. मी तुम्हाला शेतीविषयक सर्व माहिती सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न करतो.

Articles: 13

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत