Driving Licence Download: मित्रांनो, जसे आपले ड्रायव्हिंग लायसन्स हरवणे ही एक सामान्य गोष्ट आहे, तसेच आता ड्रायव्हिंग लायसन्स मोबाईलद्वारे डाऊनलोड करणे हे देखील खूप सोपे झाले आहे. आता ऑनलाइन पद्धतीने तुम्ही काही क्षणांतच ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करू शकता. म्हणूनच या लेखात आम्ही तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स कसे डाऊनलोड करावे याबद्दलची सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तर मित्रांनो, हे ड्रायव्हिंग लायसन्स मोबाईलद्वारे डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर किंवा तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित कोणताही पुरावा माहीत असावा, कारण ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी हा पुरावा तुम्हाला सादर करावा लागणार आहे. तसेच, लेखाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करण्याच्या लिंक्सदेखील देऊ, जेणेकरून तुम्ही या लेखाद्वारे सविस्तर माहिती घेऊन त्याचा संपूर्ण लाभ घेऊ शकाल.

मोबाईल किंवा लॅपटॉप मधून ड्रायव्हिंग लायसन्स कसे डाउनलोड करायचे? Driving Licence Download
माहिती | तपशील |
---|---|
पोर्टलचे नाव | परिवहन सेवा पोर्टल |
लेखाचे नाव | Driving Licence Download |
लेखाचा प्रकार | नवीनतम अद्यतन |
लेखाचा विषय | मोबाईल किंवा लॅपटॉप मधून ड्रायव्हिंग लायसन्स कसे डाउनलोड करायचे? |
मोड | ऑनलाइन |
शुल्क | शून्य |
अधिकृत वेबसाइट | https://parivahan.gov.in/parivahan/ |
ऑनलाइन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स कसे डाउनलोड करायचे?
मित्रांनो, तुम्ही देखील तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यासाठी आरटीओ कार्यालयाच्या चकरा मारून थकला आहात का? तर आता काळजी करू नका, तुम्हाला आता आरटीओ कार्यालयामध्ये जावे लागणार नाही, कारण आज आम्ही या लेखामध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स कसे डाउनलोड करायचे याबद्दलची सविस्तर माहिती समजून सांगणार आहोत.
तसेच मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करण्याकरिता तुम्हाला ऑनलाइन प्रक्रियेचे पालन करावे लागेल आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स कसे डाउनलोड करायचे याबद्दलची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्याचा पूर्ण लाभ घेता येईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखाच्या शेवटी आम्ही अधिकृत वेबसाईटच्या लिंक्स देखील देणार आहोत, जेणेकरून तुम्ही अगदी सहज पद्धतीने त्या लिंकचा वापर करून ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करू शकाल.
हे सुद्धा वाचा: PAN 2.0 म्हणजे काय? संपूर्ण माहिती व अर्ज प्रक्रिया!
हे सुद्धा वाचा: आवास प्लस सर्वेक्षण App – सविस्तर माहिती!
ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करण्याचे पर्याय
परिवहन पोर्टलवरून डाउनलोड करा
- ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सारथी परिवहनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
- त्यानंतर तुम्हाला ‘ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सेवा’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- आता येथे तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित विचारलेली सविस्तर माहिती येथे भरावी लागेल.
- DL नंबर आणि जन्मतारीख टाका आणि तुम्ही परवाना डाउनलोड करू शकता.
- त्यानंतर ‘प्रिंट ड्रायव्हिंग लायसन्स’ पर्यायावर क्लिक करा.
mParivahan App वरून डाउनलोड करा
- mParivahan ॲप्लिकेशनद्वारे ड्रायव्हिंग लायसन डाऊनलोड करण्यासाठी
- तुम्हाला mParivahan ॲप प्ले स्टोअरवरून तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे.
- त्यानंतर डीएल नंबर एंटर करा आणि तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करून घ्या.
DigiLocker वरून डाउनलोड करा
- सर्वात आधी तुम्हाला DigiLocker डाऊनलोड करायचे आहे किंवा त्याच्या वेबसाईटला भेट द्यायची आहे.
- त्यानंतर तुमचे आधीच खाते असेल तर लॉगिन करा किंवा नवीन खाते तयार करा.
- Issued Documents या सेक्शनमध्ये क्लिक करून ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ असं सर्च करा.
- आता विचारलेल्या कागदपत्रांची माहिती द्या आणि तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करून घ्या.
How to download driving license online step by step process In Marathi
- मित्रांनो, तुम्हाला देखील आता ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करायचे असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला त्याच्या अधिकृत वेबसाईटच्या होम पेजवरती जावे लागेल.
- त्यानंतर होम पेजवरती आल्यावर तुम्हाला ‘ड्रायव्हर्स/लर्नर्स लायसन्स’चा पर्याय मिळेल. यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- येथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. आता तेथे तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे.
- राज्य निवडून झाल्यानंतर आता राज्याच्या परिवहन सेवेची अधिकृत वेबसाईट तुमच्यासमोर दिसेल.
- आता येथे तुम्हाला ‘Others’ टॅब मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला ‘Search Related Applications’ चा पर्याय मिळेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
- आता येथे तुम्हाला विचारलेली आवश्यक ती माहिती टाकावी लागेल आणि सबमिट पर्यायावरती क्लिक करावे लागेल.
- क्लिक करून झाल्यानंतर आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती दिसेल.
- आता या पेजवरती स्क्रोल करा आणि खालच्या बाजूला तुम्हाला ‘Download Your DL’ चा पर्याय दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- क्लिक करून झाल्यानंतर तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्यासमोर उघडेल. आता शेवटी हा ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही तपासून घ्या आणि डाऊनलोड करा. त्यानंतर तुम्ही या ड्रायव्हिंग लायसन्सची प्रिंट पण काढू शकता.
conclusion
मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने कसे डाउनलोड करायचे याबद्दलची सविस्तर प्रक्रिया जाणून घेतली. तसेच तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स कोणत्या कोणत्या वेबसाईटवर डाऊनलोड करू शकता अशा तीन महत्त्वाच्या वेबसाईटबद्दल आम्ही माहिती दिली, जेणेकरून तुम्ही कोणत्याही समस्याशिवाय तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स तपासू शकता आणि डाउनलोड देखील करू शकता. तसेच त्याचे फायदे देखील मिळवू शकता. हा लेख जर तुम्हाला आवडला असेल, तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड करण्यास मदत होईल.