Awas Plus Survey App 2025: केंद्र सरकारकडून भारतातील ग्रामीण भागातील लोकांना घरकुल योजनेचा लाभ दिला जात आहे. आता या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील घरांची नोंदणी अगदी सुलभ आणि सोपी करण्यासाठी केंद्र सरकारने Awas Plus सर्वे ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे. या ॲप्लिकेशनच्या मदतीने ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना घरबसल्या मोफत ऑनलाइन सर्वेक्षण पूर्ण करता येईल आणि हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर पक्क्या घरांच्या सुविधेचा लाभ घेता येईल.
जर तुम्हाला देखील Awas Plus सर्व ॲप्लिकेशन्सबद्दल माहिती मिळवायची असेल, तर खालील लेख शेवटपर्यंत वाचा. कारण या लेखात आम्ही तुम्हाला Awas Plus Survey ॲप्लिकेशनबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. ही माहिती सविस्तरपणे वाचल्यानंतर तुम्ही अगदी तुमच्या पक्क्या घराचे सर्वेक्षण करून सरकारकडून देण्यात येणारी आर्थिक मदत मिळवू शकता.
Awas Plus Survey App 2025 In Marathi
Awas Plus Survey App ग्रामीण भागातील विकासासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरू केले आहे. आता ग्रामीण भागातील घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी सर्वेक्षण आणि अर्ज प्रक्रिया डिजिटल माध्यमातून अगदी सोपी करण्याचा हा या ॲप मागील एक मोठा उद्देश आहे.
जर तुम्ही देखील Awas Plus Survey App वापरून तुमच्या पक्क्या घराचे सर्वेक्षण केले, तर सर्वेक्षणानंतर काही कालावधीत सरकारकडून दिलेली आर्थिक मदत थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. आणि महत्त्वाचे म्हणजे Awas Plus Survey App हे अगदी वापरण्यास सोपे आहे आणि याला तुम्ही हिंदी किंवा इंग्रजी या दोन्ही भाषांमधून वापरू शकता.

Benefits and Features of Awas Plus Survey App 2025
तुम्हाला देखील आवास प्लस सर्वेक्षण ॲप द्वारे तुमच्या घराचे ऑनलाईन पद्धतीने सर्वेक्षण करायचे असेल, तर तुम्हाला या ॲप्लिकेशनची वैशिष्ट्ये आणि फायदे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जे की आम्ही तुम्हाला खाली दिलेल्या पॉईंट्सनुसार समजून सांगितले आहे.
- तुम्ही घरबसल्या आवास प्लस सर्वेक्षण ॲप वापरून आरामात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करू शकता.
- प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करण्याकरिता आता तुम्हाला सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही; ते तुम्ही घरी बसून ऑनलाईन पद्धतीने करू शकता.
- जर तुम्ही आवास प्लस सर्वेक्षण ॲप द्वारे अर्ज केला, तर तुमचा वेळ आणि पैसे देखील वाचतील.
- आवास प्लस सर्वेक्षण ॲपचा वापर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी देखील करू शकता; यामुळे तुम्हाला रिअल टाईम माहिती मिळते.
- आता प्रधानमंत्री ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाला पैसे देण्याची तुम्हाला गरज भासणार नाही.
- तुम्ही आवास प्लस सर्वेक्षण ॲप तुमच्या सोयीनुसार हिंदी किंवा इंग्रजी या दोन्ही माध्यमातून वापरू शकता.
आवास प्लस सर्वेक्षण ॲप 2025 साठी पात्रता
आवास प्लस सर्वेक्षण ॲप्लिकेशनद्वारे तुमच्या नवीन घरासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे:
- आवास प्लस सर्वेक्षण ॲप्लिकेशनद्वारे अर्ज करण्यासाठी मूळ लाभार्थी ग्रामीण भागातील असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्याचे नाव हे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या यादीत समाविष्ट केलेले असावे.
- महत्वाचे म्हणजे कायमस्वरूपी घर बांधण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे वैध शिधापत्रिका प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- अर्ज करताना अर्जदाराचे यापूर्वी कोणतेही कायमस्वरूपी पक्के घर नसावे.
- तसेच अर्जदाराकडे किंवा त्याच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन नसावे.
हे पण वाचा : Bandhkam Kamgar Yojana Online Form 2025: बांधकाम कामगार योजना ऑनलाईन अर्ज सुरू!
आवास प्लस सर्वेक्षण ॲप 2025 साठी आवश्यक कागदपत्रे
आवास प्लस सर्वेक्षण अर्ज 2025 वापरण्यासाठी तुमच्याकडे खाली दिलेली सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे-
- आधार कार्ड
- मूळ पत्ता पुरावा
- जात प्रमाणपत्र
- शिधापत्रिका प्रमाणपत्र
- बँक खाते माहिती
- जमिनीची कागदपत्रे
- गृहनिर्माण योजनेच्या यादीत नाव
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
आवास प्लस सर्वेक्षण ॲप 2025 कसे डाउनलोड करावे
जर तुम्हाला देखील आवास प्लस सर्व ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करून अगदी सहजपणे हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता आणि तुमच्या घराचा सर्वे व्यवस्थित करू शकता.
- सर्वप्रथम हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला भेट द्यावी लागेल. त्यानंतर सर्च बॉक्समध्ये ‘आवास प्लस सर्वे ॲप’ असे लिहावे लागेल.
- आता तुमच्या समोर ग्रामीण विकास मंत्रालयाने जारी केलेले आवास प्लस सर्वे ॲप्लिकेशन उघडेल. ते तुम्हाला डाउनलोड बटनवर क्लिक करून डाऊनलोड करून घ्यायचे आहे.
- त्यानंतर हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावे लागेल.
- हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर अगदी सहजपणे लेखामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही हे ॲप्लिकेशन वापरू शकता.
आवास प्लस सर्वेक्षण ॲप 2025 मध्ये ऑनलाइन सर्वेक्षण कसे करावे
तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की आवास प्लस सर्वेक्षण हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने सर्वेक्षण कसे करावे, तर या प्रश्नाचे उत्तर आम्ही खाली दिलेल्या स्टेप नुसार अगदी सहज आणि व्यवस्थित रित्या तुम्हाला दिले आहे.
- सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये ‘आवास प्लस सर्वेक्षण’ ॲप्लीकेशन ओपन करावे लागेल.
- त्यानंतर नोंदणी करण्यासाठी आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर तुम्हाला या ॲप्लिकेशनच्या स्क्रीन मध्ये टाकावा लागेल. मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल, तो यशस्वीरित्या भरून घ्या.
- जेव्हा तुमची नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण होईल, तेव्हा तुमच्यासमोर ॲपचे मुख्य पृष्ठ दिसेल.
- त्यानंतर तुम्हाला सर्वेक्षण बटन मिळेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करावे लागेल.
- आता ॲपच्या अर्जामध्ये विचारलेली आवश्यक वैयक्तिक माहिती तसेच लागणारी कागदपत्रे तुम्हाला येथे अपलोड करावी लागतील.
- अशा प्रकारे तुम्ही ‘आवास प्लस सर्वेक्षण’ एप्लीकेशन वापरून अगदी सहज पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने सर्वेक्षण करू शकता.
Important links
AwaasPlus App | Download करा |
SHETI KHAJANA | HOME PAGE |
ग्रामीण विकास मंत्रालय | अधिकृत वेबसाइट |