महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपयांनी एकूण (१० हप्ते) जमा केले आहेत. तर आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मे महिन्यातील अकराव्या हप्त्याबद्दल एक नवीन अपडेट दिला आहे.
त्यानुसार, मे महिन्यातील पंधराशे रुपये म्हणजेच अकराव्या हप्त्याची रक्कम महिलांच्या बँक खात्यात दोन टप्प्यांमध्ये पाठवण्यात येईल. आता ज्या महिला पहिल्या अकराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत, त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच सरकारकडून अकराव्या हप्त्याची रक्कम म्हणजेच १५००० रुपये जमा करण्यात येणार आहे.
पण महिलांना या 11 व्या हप्त्याचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी पर्याय सक्रिय करावा लागेल, जेणेकरून सरकारने दिलेली मदतीची रक्कम कोणत्याही अडचणीशिवाय थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. तसेच सर्व महिलांच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत अकराव्या हप्त्याची लाभार्थी यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच त्या यादीमध्ये सर्व महिलांची नावे आहेत ज्यांना आगामी काळात अकराव्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे.
जर तुम्हाला हा हप्ता मिळेल की नाही अशी जर काळजी वाटत असेल, तर या यादीमध्ये तुम्ही स्वतःचे नाव एकदा नक्की तपासा. तसेच आज आपण या लेखामध्ये मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अकराव्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Ladki bahin yojana may installment date
महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी तसेच आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे महिलांना दरवर्षी अठरा हजार रुपयांचा लाभ मिळतो आणि या सोबतच ही रक्कम महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहित देखील करते. तसेच या योजनेअंतर्गत आतापर्यंत सरकारकडून महिलांच्या बँक खात्यामध्ये एकूण दहा हप्ते जमा करण्यात आले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिला व बालविकास विभाग अंतर्गत अकराव्या हप्त्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे आणि हा मे महिन्यातील अकरावा हप्ता म्हणजेच पंधराशे रुपये लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील.
Ladki Bahin Yojana 11th Hafta Date In Marathi
महिला व बाल विकास विभागांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अकराव्या हप्त्याबाबत एक नवीन अपडेट जारी करण्यात आले आहे. आता यानुसार अकराव्या हप्त्याची रक्कम महिलांच्या बँक खात्यामध्ये दोन टप्प्यांत दिली जाईल. तसेच पहिला टप्पा हा २४ मे पासून सुरू होऊ शकतो. या टप्प्यांमध्ये अकराव्या हप्त्याची रक्कम एक कोटीहून अधिक महिलांना सरकारमार्फत दिली जाऊ शकते. यानंतर उर्वरित महिलांना २६ किंवा २७ मे पासून दुसऱ्या टप्प्यात अकराव्या हप्त्याचा लाभ देण्यात येईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी राज्य सरकारने ३६९० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प देखील सादर केला आहे.
लाडकी बहीण योजना 11वा हप्ता – पात्रता
- मुख्यमंत्री माझी लाडकी पण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला महाराष्ट्राची कायमची रहिवासी असावी.
- महिलेचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे.
- महत्वाचे म्हणजे अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी अस नये, यासोबतच आयकर भरणारा नसावा आणि महिलेकडे ट्रॅक्टर व्यतिरिक्त कोणतेही चारचाकी वाहन नसावे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असायला हवे.
- या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदार महिलेचे एकच बँक खाते असावे आणि हे बँक खाते डीबीटी सक्रिय असणे आवश्यक आहे.
Ladki Bahin Yojana 11th Installment List In Marathi
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अकराव्या हप्त्याची यादी बघण्यासाठी किंवा यादीमध्ये तुमचे नाव बघण्यासाठी तुम्हाला खाली दिलेले स्टेप्स फॉलो करायचे आहेत.
- सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
- यानंतर होम पेजवर दिलेल्या अर्जदार लॉगिन या पर्यायावर क्लिक करा.
- आता यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्डने लॉगिन करायचे आहे. पासवर्ड लक्षात नसेल, तर तुम्ही ओटीपी पर्याय सिलेक्ट करून पण लॉगिन करू शकता.
- आता हे केल्यानंतर ‘Application Made Earlier’ या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर ‘Application Status’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- आता यानंतर तुमच्यासमोर अर्जाची संपूर्ण स्थिती उघडेल. जर तुमच्या नावासमोर ‘Approved’ असे दिलेले असेल, तर तुमचे नाव यादीमध्ये समाविष्ट केले जाईल आणि तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अकराव्या हप्त्याचा लाभ दिला जाईल.
Ladki Bahin Yojana 11th Hafta Status check In Marathi
- आता यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- यानंतर होम पेजवर ‘अर्जदार लॉगिन’ पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- आता समोर दिलेल्या पर्यायांमधून ‘पेमेंट स्टेटस’ या पर्यायावर क्लिक करा.
- आता समोरील पेजवर तुमचा अर्ज क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करून सबमिट बटनावर क्लिक करा.
- हे केल्यानंतर तुमच्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अकराव्या हप्त्याची स्थिती उघडेल.
conclusion
तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अकराव्या हप्त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतली. यासोबतच हा अकरावा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये किती तारखेपर्यंत जमा होऊ शकतो हे पण आज आपण जाणून घेतले. आता हा महत्त्वाचा लेख तुमच्या लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अकराव्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पंधराशे रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये कसे जमा होऊ शकतात हे पण त्यांना समजेल.