PAN 2.0 Online Apply : मित्रांनो, आपल्याला उत्पन्नाशी संबंधित कोणत्याही आर्थिक कामासाठी पॅनकार्डची अत्यंत आवश्यकता असते. त्यामुळे तुमचे पॅन कार्ड हे सुरक्षित राहणे फार महत्त्वाचे आहे. तसेच तुमचे पॅन कार्ड सुरक्षित करण्यासाठी आता सरकारने ‘पॅन २.०’ नावाचे नवीन प्रकारचे पॅन कार्ड लॉन्च केले आहे. तर, आता हे नवीन पॅन कार्ड तयार केल्यानंतर तुम्ही तुमच्या उत्पन्नाशी संबंधित सर्व माहिती अगदी सुरक्षित करू शकता आणि भविष्यात होणाऱ्या डिजिटल फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण देखील करू शकता.
तर मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये पॅन कार्ड 2.0 काय आहे, तसेच त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि हे पॅन कार्ड घरपोच कसं मिळवायचं याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यासोबतच हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्याकरिता शेवटपर्यंत वाचा.
PAN 2.0 – Overview
वैशिष्ट्य | तपशील |
---|---|
कार्ड नाव | PAN 2.0 |
प्रक्षेपण संस्था | भारत सरकार |
सुरक्षा वैशिष्ट्ये | QR कोड, एनक्रिप्टेड डेटा |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन (अधिकृत वेबसाइट) |
फी | ₹५० (पॅन रिप्रिंटसाठी) |
वितरण वेळ | 7 ते 15 दिवस (पोस्टद्वारे) |
अनिवार्यता | नाही (पर्यायी) |
फायदे | फसवणूक प्रतिबंध, डिजिटल पडताळणी |
What Is Pan 2.0 In Marathi

भारत सरकारने पॅन कार्ड २.० हे डिजिटल सुरक्षा वाढवण्यासाठी लॉन्च केले आहे. या नवीन पॅन कार्डमध्ये तुम्हाला आता कोणतीही माहिती मुद्रित स्वरूपात दिसणार नाही, पण त्याऐवजी तुम्हाला एक डायनामिक क्यूआर कोड दिला जाईल, जो स्कॅन केल्यानंतर तुमची माहिती दर्शवेल.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कार्डचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आता हे शंभर टक्के पेपरलेस असेल, तसेच हे पॅन कार्ड तुम्हाला अगदी सहजरीत्या ऑनलाईन पद्धतीने बनवता येईल. पॅन कार्ड बनवण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता, तसेच पॅनकार्डाची संबंधित माहिती या पोर्टलद्वारे त्वरित अपडेट केली जाईल.
ज्याप्रकारे जुन्या पॅन कार्डमधील चुका दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एक नवीन पॅन कार्ड तयार करावे लागत होते, तो त्रास आता संपेल, कारण तुम्हाला या पॅन कार्डमध्ये जे काही अपडेट करायचे असेल ते ‘पॅन २.०’ पोर्टलद्वारे त्वरित अपडेट करता येईल, जेणेकरून तुमचा वेळ देखील वाचेल.
Pan 2.0 ऑनलाइन कसे बनवायचे
पॅनकार्ड 2.0 बनवण्यासाठी भारत सरकारद्वारे एक नवीन पोर्टल सुरू केले जाईल, ज्याद्वारे तुम्ही पॅन कार्ड झिरो पॉईंटमध्ये अगदी सहज पद्धतीने बनवू शकता आणि डाउनलोड देखील करू शकता. या पोर्टलद्वारे तुम्ही पॅन कार्डासंबंधित सर्व कामे एकाच ठिकाणी करू शकता.
पण सध्या पॅन कार्ड २.० तयार करण्यासाठी सरकारने कोणतेही पोर्टल सुरू केलेले नाही. म्हणून, जर कोणी तुम्हाला सांगत असेल की तुम्ही NSDL किंवा UTI वेबसाइटवरून पॅन २.० ऑर्डर करू शकता, तर ती चुकीची माहिती आहे.
पण तुम्हाला जर पॅन कार्ड २.० बनवायचे असेल, तर तुम्हाला थोडीफार प्रतीक्षा करावी लागेल कारण सरकारने पॅन कार्ड २.० पोर्टल लाँच केल्याबरोबरच आम्ही तुम्हाला या वेबसाईटद्वारे लगेच कळवू आणि नवीन पॅन कार्ड कसे तयार करायचे आणि त्या पोर्टलमध्ये कोणती कोणती माहिती भरावी लागणार आहे, हे देखील सांगू.
हे सुद्धा वाचा : ऑनलाइन जन्म प्रमाणपत्र कसं काढायचं?
पॅन कार्ड 2.0 बनवणे अनिवार्य आहे का
सर्वांना असा प्रश्न पडला आहे की आधीच जुनी पॅन कार्ड वैद्य असताना सरकारने नवीन पॅन कार्ड का तयार केले आहे आणि हे पॅन कार्ड बनवणे सक्तीचे आहे का, तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला तुमचे पॅन कार्ड अधिक सुरक्षित बनवायचे असेल आणि या नवीन पॅन कार्ड चा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही भविष्यात पॅन कार्ड 2.0 हे पोर्टल सुरू झाल्यानंतर यासाठी अगदी सहज पद्धतीने अर्ज करू शकता आणि सरकारने असे सांगितले आहे की हे पॅन कार्ड बनवणे सध्या तरी अनिवार्य नाही, पण तुम्हाला आर्थिक व्यवहारांमध्ये आणखी सुरक्षित व्हायचे असेल तर तुम्ही फक्त पन्नास रुपये शुल्क भरून नवीन पॅन कार्ड 2.0 तयार करून घरी बोलावून घेऊ शकता आणि त्याचे फायदे घेऊ शकता.
पॅन कार्ड 2.0 साठी पात्रता काय आहे
- आता ज्या लोकांचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे, असे लोक या नवीन पॅनकार्ड 2.0 साठी अर्ज करू शकतात.
- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा नंबर तुमच्या पॅन कार्ड आणि आधार कार्ड शी लिंक केलेला असावा.
पॅन कार्ड 2.0 फायदे
- नवीन पॅन कार्ड हे सुरक्षित आहे या कार्डवर कोणतेही माहिती छापलेली नाही त्याऐवजी तुम्हाला एक डायनामिक QR कोड दिला जातो ज्यामध्ये तुमची सर्व माहिती दिलेली असते
- QR कोड अगदी सुरक्षित आहे हा QR कोड स्कॅन केल्यानंतर तुमची सर्व माहिती उपलब्ध होते आणि आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामान्य लोक ते स्कॅन करू शकणार नाही
- या पॅन कार्डद्वारे फसवणूक कमी होते नवीन पॅन कार्ड मध्ये कोणतीही माहिती दिली जात नाही जेणेकरून तुम्ही आर्थिक व्यवहारांमध्ये अगदी सुरक्षित राहता यामुळे तुमची फसवणूक होत नाही
- अगदी सहज पद्धतीने ऑनलाईन अपडेट तर बघा डायनॅमिक किंवा कोड असल्यामुळे तुम्ही पॅन कार्ड २.० पोर्टलवर कोणतीही माहिती कधीही ऑनलाइन पद्धतीने अपडेट करू शकता जे थेट तुमच्या पॅन कार्ड मध्ये पण बदलली जाते
- एक पोर्टल – पॅन कार्ड सध्या NSDL, UTIITSL, Protean e-Gov द्वारे बनवले आणि सुधारले आहे परंतु पॅन 2.0 पोर्टलच्या आगमनाने, सर्व काम एकाच ठिकाणी केले जाईल.
पॅन कार्ड 2.0 ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 2025
मित्रांनो, तुम्हाला देखील नवीन पॅन कार्ड 2.0 घरपोच मिळवायचे असेल, तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारकडून नवीन पॅन कार्ड 2.0 बनवण्यासाठी अद्याप कोणतेही अधिकृत पोर्टल सुरू करण्यात आले नाही. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा काही लोकांचे पॅन कार्ड पुन्हा छापले गेले, तेव्हा त्यांना सरकारकडून नवीन पॅन कार्ड २.० प्राप्त झाले, तर काही लोकांना जुने पॅन कार्डच मिळाले. त्यामुळे तुम्हाला पॅन कार्ड २.० बनवायचे असेल, तर थोडी प्रतीक्षा करा.
आणि तरीही तुम्हाला ते पुन्हा मुद्रित करायचे असल्यास, खाली दिलेल्या चरणांचे अनुसरण करा –
- तुम्हाला देखील पॅन कार्ड २.० साठी अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला सर्वप्रथम पॅन कार्डच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
- त्यानंतर तुम्हाला वरच्या बाजूला ‘रीप्रिंट पॅन कार्ड’ हा पर्याय दिसेल, तेथे तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. यामध्ये तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर, जन्माची तारीख आणि कॅप्चा हा दिलेल्या बॉक्समध्ये भरायचा आहे आणि सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्या पॅन कार्डची सर्व माहिती तुमच्यासमोर दिसेल. आता तुम्हाला पडताळणीसाठी ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबर हा पर्याय मिळेल. त्यापैकी कोणताही एक निवडा. जर तुम्ही मोबाईल नंबर हा पर्याय निवडला, तर फारच चांगले. त्यानंतर ‘रिक्वेस्ट ओटीपी’ या पर्यायावर क्लिक करा.
- जर आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही मोबाईल नंबर निवडला असेल, तर तेथे ओटीपी पाठवला जाईल. तो तुम्हाला ओटीपी बॉक्समध्ये टाईप करायचा आहे. त्यानंतर व्हॅलिडेट बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर पेमेंटचा पर्याय दिसेल. तुम्हाला येथे पेमेंट करावे लागेल. त्यानंतर एक पावती मिळेल, ती व्यवस्थित सांभाळून ठेवा.
- तुमचे पॅन कार्ड रिप्रिंट केल्यानंतर, ते पोस्ट ऑफिसद्वारे तुमच्या घरी ७ ते १५ दिवसांत वितरित केले जाईल.
Important Links
NSDL Pan Card Website | https://www.onlineservices.nsdl.com/ |
UTI Pan Card Website | https://www.utiitsl.com/ |
conclusion
तर आज आपण नवीन पॅन कार्ड २.० बद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली, तसेच हे पॅन कार्ड तुम्ही कसे बनवू शकता याची प्रक्रिया देखील आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे समजावून सांगितली. या लेखात मी नवीन पॅन कार्ड २.० बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती दिली, तसेच त्याची अर्ज प्रक्रिया देखील समजावून सांगितली. आशा करतो की हा लेख तुम्हाला उपयुक्त वाटला असेल.