PM Wani WiFi Yojana 2025: मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आजकालच्या डिजिटल युगामध्ये इंटरनेट हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. शिक्षणापासून ते व्यवसायापर्यंत इंटरनेटने अंतर भरून काढले आहे आणि इंटरनेटमुळे अनेक नवीन संधी देखील उघडल्या आहेत. आता भारताच्या अनेक भागांत, विशेषतः ग्रामीण भागामध्ये इंटरनेट वापरणे एक आव्हान आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आपल्या भारत सरकारने PM-WANI WiFi योजना 2025 लॉन्च केली आहे, ज्याचा उद्देश ग्रामीण भागातील लोकांपर्यंत इंटरनेट पोहोचवणे आणि त्यांना डिजिटल युगासोबत कनेक्ट करणे असा आहे.
तर आज आपण या लेखात PM Wani WiFi Yojana 2025 काय आहे, त्याचे फायदे काय आहेत तसेच तुम्ही या योजनेसाठी अर्ज कसा करू शकता याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
PM Wani WiFi Yojana काय आहे
पीएम वाणी योजना म्हणजे प्रधानमंत्री यांचा वायफाय एक्सेस नेटवर्क इंटरफेस आहे. आता देशभरात मोफत आणि परवडणारे सार्वजनिक वायफाय प्रवेश प्रदान करण्यासाठी भारत सरकारने हा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. इंटरनेट सेवा देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, विशेषता ग्रामीण भागामध्ये आणि कमी सेवा असलेल्या भागात पोहोचवण्यासाठी भारत सरकारने ही योजना सुरू केली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे या योजनेची सुरुवात डिजिटल इंडिया या कार्यक्रमांतर्गत सुरू केली होती.

ग्रामीण भागातील आणि दुर्गम भागातील लोकांना अर्ध्या कमी खर्चात आणि सहज इंटरनेट वापरणे शक्य व्हावे यासाठी केंद्र सरकारमार्फत ही योजना सुरू करण्यात आली आहे. आता जे नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आवश्यक आहे.
Helpful Summary of PM Wani Wifi In Marathi
Attribute | Details |
---|---|
Name of the Scheme | PM Wani Wifi |
Launched by | Government of India |
Objective | Wi-Fi facilities |
Beneficiaries | Citizens of India |
Official Website | PM Wani Portal |
PM Wani Wifi Price In Marathi
- INR 6 वैधता 1-दिवस डेटा 1GB
- INR 9 वैधता 2-दिवस डेटा 2 GB
- INR 18 वैधता 3-दिवस डेटा 5 GB
- INR 25 वैधता 7-दिवस डेटा 20 GB
- INR 49 वैधता 14-दिवस डेटा 40 GB
- INR 99 वैधता 30-दिवस डेटा 100 GB
Benefits of PM Wani Wifi Connection In Marathi
- या योजनेच्या मदतीने भारतीय नागरिकांना प्रायव्हेट सेक्टरपेक्षा कमी दरात वायफाय सुविधा मिळणार आहे.
- ही योजना इंटरनेट उपलब्ध करून देऊन भारतीय नागरिकांना तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यास अत्यंत मदत करणार आहे.
- सार्वजनिक सेवा स्थापन करून भारत सरकार खेड्यांमध्ये ही इंटरनेट सुविधा पुरवू शकते.
- या योजनेअंतर्गत भारतातील नागरिक इंटरनेटच्या मदतीने कोणत्याही समस्या अगदी सहज पद्धतीने सोडवू शकतात.
PDO म्हणजे काय आणि PDO कोण बनू शकतो?
सार्वजनिक डेटा कार्यालये, म्हणजेच PDO हे इंटरनेट बूथ आहेत, जे केवळ WANI-अनुरूप वाय-फाय ऍक्सेस पॉइंट्सची स्थापना, तसेच देखरेख आणि संचालन करतील आणि ग्राहकांना ब्रॉडबँड सेवा देतील. आता इंटरनेट सुविधा उभारून कोणीही भारतामध्ये PDO बनू शकतो. PDO होण्यासाठी व्यक्तीला कोणत्याही नोंदणी प्रक्रियेतून जावे लागत नाही. कोणत्याही गाव पातळीवर तसेच उद्योजक, किराणा दुकान मालक, चहा हॉटेल तसेच भाजीपाला दुकान, रेस्टॉरंट मालक इत्यादी सर्व PDO बनू शकतात आणि वायफाय इंटरनेट/ब्रॉडबँड सेवा सुरू करू शकतात.
PDOA कोण आहे?
पब्लिक डेटा ऑफिस एग्रीगेटर (PDOA) ला अधिकृतता आणि लेखा यांच्यासारख्या एकत्रित सेवा प्रदान करेल, ज्यामुळे PDOA ला अंतिम ग्राहकांना सेवा प्रदान करण्यासाठी अत्यंत मदत होईल. जर एखाद्या व्यक्तीची कंपनी कायदा, 2013 अंतर्गत नोंदणीकृत कंपनी असेल, तर ती PDOA साठी नोंदणी करण्यासाठी DoT च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकते.
PDO ला किती फायदा होईल?
PDO ला या दिवसाच्या एकूण रिचार्ज पैकी 80 टक्के मिळतील. उदाहरणार्थ, जर PDO ने पाचशे रुपयांपर्यंत रिचार्ज विकले, तर त्याला त्या 500 रुपयांच्या 80 टक्के मिळतील, म्हणजेच त्याला चारशे रुपये मिळतील आणि हे चारशे रुपये त्याच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील.
PM Wani Wifi Device Features In Marathi
केंद्र सरकारने देशभरात इंटरनेट सुविधा देण्यासाठी ‘पीएम-वाणी’ योजनेअंतर्गत वाय-फाय सुविधा सुरू केली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतातील नागरिकांना बाजारापेक्षा अत्यंत कमी दरात इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने ही योजना सुरू केली आहे.
Amount | INR 23,600 | INR 11,800 |
User | 500 | 150 |
Range | 300Meter | 150Meter |
Speed | 20 Mbps | 20 Mbps |
Range degree | 120 | 120 |
How PDO Can Track Their Users In Marathi
- सर्वप्रथम, पीडीओने भारत सरकारच्या पीएम वाणी या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- पीडीओ अधिकृत वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर पोहोचल्यानंतर, उपलब्ध असलेल्या पीडीओ पोर्टलच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- आता एक अर्जाचा फॉर्म तुमच्यासमोर दिसेल. पीडीओने विचारलेली सर्व माहिती यामध्ये भरणे आवश्यक आहे. त्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा.
- आता तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवरती एक नवीन स्क्रीन उघडेल. पीडीओने अहवालात ‘वापरकर्ता’ आणि ‘लॉगिन अहवाल’ या शीर्षकाखालील पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- ‘वापरकर्ता लॉगिन अहवाल’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, पीडीओ वापरकर्त्यांच्या संबंधित सर्व माहितीचा मागोवा घेऊ शकतो आणि ती मिळवू देखील शकतो.
Contact Details
Contact Details | Email ID:- [email protected] |
PM Wani Wifi | https://pmwani.gov.in/wani |
FAQs
केंद्र सरकारने पीएम वाणी वाय-फाय योजना सुरू केली.
केंद्र सरकारने पीएम वाणी वाय-फाय योजना सुरू केली.
पीएम वाणी वाय-फाय योजनेंतर्गत पीडीओची कमाई कशी होईल?
PDO ला सर्व रिचार्जच्या एकूण 80% प्राप्त होतील.