कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी घोषणा केली की पीएम किसान 22 जून 2024 रोजी लॉन्च झाले. हे ॲप पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी अगदी फायदेशीर ठरेल आणि याच उद्देशाने ते विकसित करण्यात आले आहे. या ॲपमध्ये फेस ऑथेंटिकेशन वैशिष्ट्ये आहेत, ज्याद्वारे शेतकरी त्यांच्या चेहऱ्याची ओळख दाखवून अगदी सहज पद्धतीने केवायसी करू शकतात. पीएम किसान मोबाईल ॲप द्वारे शेतकरी कोणत्याही त्रासाशिवाय ओटीपी आणि फिंगरप्रिंटशिवाय देखील केवायसी करू शकतात. याशिवाय ते शंभर शेतकऱ्यांना त्यांची माहिती देखील देऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खोटे दावे रोखणे हा या ॲपचा मुख्य उद्देश आहे.

PM Kisan Beneficiary List In Marathi
केंद्र सरकार की महत्वाकांक्षी व किसानों को आय सहायता के लिए लोकप्रिय योजना “प्रधानमंत्री किसान सम्मान निधि” के अंतर्गत आज फेस ऑथेंटिकेशन फीचर के साथ पीएम-किसान मोबाइल ऐप लांच किया।#PMKisan #PMKisanApp @AgriGoI pic.twitter.com/iJeroh3UCq
— Narendra Singh Tomar (@nstomar) June 22, 2023
पीएम किसान मोबाईल ॲपची माहिती
लेखाचे नाव | पीएम किसान मोबाइल ॲप |
---|---|
केंद्र सरकारने सुरू केले | केंद्र सरकार |
विभाग | कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय |
लाभार्थी | भारतातील शेतकरी |
उद्देश | OTP आणि फिंगरप्रिंटशिवाय शेतकऱ्यांना eKYC सुविधा घरपोच उपलब्ध करून देणे |
वर्ष | 2024 |
ॲप ऑनलाइन डाउनलोड करण्याची प्रक्रिया | उपलब्ध |
मोबाइल ॲप लिंक | पीएम किसान मोबाइल ॲप |
पीएम किसान मोबाईल ॲपचा उद्देश
शेतकऱ्यांसाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने पीएम किसान मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. हे ॲप लॉन्च करण्याचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांना ई-केवायसी सुविधा प्रदान करणे असा आहे. या ॲपद्वारे शेतकरी ओटीपी आणि फिंगरप्रिंट शिवाय केवायसी करू शकतात. पीएम किसान ही योजना जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना म्हणून ओळखली जाते. त्यामध्ये केंद्र सरकारकडून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दरवर्षी तीन हप्त्यांनी सहा हजार रुपये दिले जातात. पीएम किसान मोबाईल ॲपवरून शेतकरी त्यांच्या पुढील हप्त्याची माहिती देखील मिळवू शकतात. हे ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड केल्यानंतर शेतकऱ्याला कोणत्याही कार्यालयामध्ये माहिती घेण्यासाठी जाण्याची गरज भासत नाही.
पीएम किसान मोबाईल ॲपचे फायदे आणि वैशिष्ट्ये
- हे ॲप्लिकेशन शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे कारण यामध्ये पाथर्डी केशरसाखे फिचर मिळतात.
- या ॲपद्वारे तुम्ही घरबसल्या ई-केवायसी करू शकता.
- तसेच तुम्ही कोणत्याही ओटीपी किंवा फिंगरप्रिंटशिवाय ती ई-केवायसी करू शकता.
- या ॲपच्या मदतीने तुम्ही फेस स्कॅन करून ई-केवायसी करू शकता.
- याद्वारे इतर शंभर शेतकऱ्यांना देखील ई-केवायसी करण्यात मदत करता येते.
- महत्त्वाचे म्हणजे, भारत सरकारने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य मानली आहे, जी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांपर्यंत वाढवली आहे.
- प्रत्येक अधिकारी आता पाचशे शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण करू शकतो.
- शेतकऱ्यांना या संबंधित माहितीसाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही; आता या ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही अगदी सहज पद्धतीने सर्व माहिती मिळवू शकता.
पीएम किसान मोबाईल ॲप कसे डाउनलोड करावे?
पी एम किसान मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला खालील प्रक्रियेचे पालन करून सर्व स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यानंतर तुम्ही हे ॲप्लिकेशन अगदी सहज पद्धतीने इन्स्टॉल करू शकता.
- सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला भेट द्यायची आहे.
- त्यानंतर सर्च बारमध्ये ‘पीएम किसान ॲप‘ असे टाईप करा आणि सर्च बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला मुख्यपृष्ठावर पीएम किसान ॲप्लिकेशन दिसेल.
- आता इन्स्टॉल बटणावर क्लिक करा.
- हे ॲप्लिकेशन डाऊनलोड झाल्यावर ओपन या बटणावर क्लिक करा. आता तुम्ही घरी बसून पीएम किसान मोबाईल ॲपद्वारे या योजनेविषयी सविस्तर माहिती मिळवू शकता आणि ई-केवायसी देखील करू शकता.
PM Kisan Mobile App FAQs
पीएम किसान मोबाईल ॲप काय आहे?
पी.एम. किसान ॲप्लिकेशनच्या मदतीने शेतकरी ओटीपी किंवा फिंगरप्रिंटशिवाय घरबसल्या ई-केवायसी पूर्ण करू शकतात.
पीएम किसान मोबाईल ॲप कधी लाँच करण्यात आले?
हे ॲप्लिकेशन केंद्र सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी २२ जून २०२४ रोजी लॉन्च करण्यात आले.