Ladki Bahin Yojana 10 Installment: महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत तसेच महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्यातील दहावा हप्ता लवकरच 2 कोटी 41 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये महाडीबीटीमार्फत जमा केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकार 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना आर्थिक मदत म्हणून 1500 रुपये देत असते.
आतापर्यंत ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र होत्या, अशा लाभार्थी महिलांना सरकारमार्फत एकूण नऊ हप्ते देण्यात आले आहेत. तर आता महिलांकडून या योजनेचा दहावा हप्ता कधी येणार याची प्रतीक्षा केली जात आहे. राज्य सरकारमार्फत असे सांगण्यात आले आहे की एप्रिल महिन्याच्या अखेरीस महिलांच्या बँक खात्यामध्ये १०वा हप्ता जमा करण्यात येईल.
कोणत्या महिलांना एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तसेच लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत याची देखील माहिती आम्ही या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला दिली आहे, म्हणून लेख शेवटपर्यंत वाचा.

Ladki Bahin Yojana 10 Installment Details
योजनेचे नाव | माझी लाडकी बहिण योजना |
---|---|
लाभ | राज्यातील महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतील |
सुरुवात कोणी केली? | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
सुरुवात | २८ जून २०२४ पासून |
लाभार्थी | राज्यातील महिला |
वयोमर्यादा | किमान २१ वर्षे, कमाल ६५ वर्षे |
उद्दिष्ट | महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबी बनवण्यासाठी |
दरमहा रक्कम | १५०० रुपये |
पुढील हप्ता | एप्रिल महिन्यात (१०वा हप्ता) |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन/ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | https://ladakibahin.maharashtra.gov.in |
Ladki Bahin Yojana 10 Installment
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी २८ जून २०२४ रोजी महिला सक्षमीकरणाला चालना देण्याकरिता आणि महिलांचे पोषण, आर्थिक स्वातंत्र्य सुधारावे तसेच त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती मजबूत व्हावी या उद्देशाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी तसेच मार्च अशा एकूण नऊ महिन्यांचे हप्ते प्रत्येकी पंधराशे रुपयांप्रमाणे डीबीटी मार्फत जमा करण्यात आले. आतापर्यंत महिलांना एकूण १३ हजार ५०० रुपये देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा पहिला हप्ता २४ एप्रिल २०२५ पासून दोन कोटी ४१ लाख पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीमार्फत जमा केला जाऊ शकतो. तसेच सरकारचे असे सांगणे आहे की हा हप्त्याचा दावा दोन टप्प्यांमध्ये वितरित केला जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्त्याचा दावा दोन टप्प्यांमध्ये मिळणार आहे. पहिला हप्ता २४ एप्रिल २०२५ पासून सुरू करण्यात येईल, तर दुसरा टप्पा २७ एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.
लाडकी बहीण योजना पात्रता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दहाव्या हप्त्यानुसार, एप्रिल महिन्यात या योजनेचा दहावा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. पण सरकारने या योजनेसाठी काही पात्रता आणि निकष पूर्ण करणे महिलांना बंधनकारक केले आहे. जर महिलांनी या योजनेची पात्रता आणि निकष पूर्ण केले नाहीत, तर त्यांचे अर्ज नाकारले जातील आणि त्यांना या योजनेचा लाभ देखील मिळणार नाही.
eligibility for ladki bahin yojana 10th installment
- लाभार्थी महिलेचा अर्ज लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरून मंजूर होणे आवश्यक आहे.
- लाभार्थी महिला महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी असावी.
- लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- महिलेच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता, म्हणजेच इन्कम टॅक्स भरणारे नसावेत.
- लाभार्थी महिलेचे वय २१ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे, तरच महिलेला लाभ देण्यात येईल.
- महिलेच्या कुटुंबाकडे ट्रॅक्टरशिवाय चारचाकी वाहन नसावे.
- तसेच, लाभार्थी महिलेचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे आणि त्यामध्ये डीबीटी पर्याय सक्रिय असावा.
- लाभार्थी महिला जर संजय गांधी योजनेचा लाभ घेत असेल, तर तिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवण्यात येईल.
या महिलांना मिळणार 3000 हजार रुपये
मागील महिन्यात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता आणि मार्च महिन्याचा नववा हप्ता असल्याने ते वाटप करण्यात आला होता, ज्यामध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये एकूण तीन हजार रुपये जमा झाले.
परंतु अशा अनेक महिला आहेत ज्या महिलांना फक्त नववा हप्ताच मिळाला. अनेक महिलांना आठव्या आणि नव्या हप्त्याचे पैसे देखील मिळाले नाहीत. पण मिळालेल्या माहितीनुसार, या महिलांना एप्रिल महिन्यात मागील महिन्याचे पैसे दिले जाणार आहेत.
जर महिलेला एकच हप्ता मिळाला असेल आणि तिला नवा हप्ता मिळाला असेल, तर त्या महिलांना नववा आणि दहावा हप्ता मिळणार आहे, ज्यामध्ये त्यांना एकूण तीन हजार रुपये मिळतील. आणि ज्या महिलांना मार्च महिन्यात एकही हप्ता मिळाला नाही, अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये तिन्ही हप्त्यांचे पैसे जमा करण्यात येतील.
यामध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये आठवा, नववा आणि दहावा हप्ता आता एकत्रितपणे जमा होणार आहे. त्यानुसार महिलांना एकूण ₹ 4500 वाटप करण्यात येतील. मात्र, हप्ते घेण्यासाठी महिलेचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे, तसेच त्यामध्ये डीबीटी पर्याय सक्रिय असावा.
लाडकी बहीण योजनेत या महिला अपात्र होणार
फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र सरकारने महिला व बाल विकास विभागाला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व महिलांचे अर्ज तपासण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सर्व लाभार्थी महिलांचे अर्ज तपासण्यात आले.
या अर्जांमध्ये खरंच महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती आहे, महिलेचे वय किती आहे, महिलेकडे चार चाकी वाहन आहे की नाही या बाबत तपास करण्यात आला आणि तपासणी पूर्ण झाल्यानंतर पाच लाखांहून अधिक महिलांनी योजनेचे पात्रता व निकष पूर्ण केले नाहीत असे निदर्शनास आले. अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून अपात्र करण्यात आले.
ज्या महिलांचे अर्ज योजनेद्वारे नाकारले गेले आहेत, त्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या दहाव्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात की अपात्र ठरला आहात हे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तपासू शकता.
Ladki Bahin Yojana 10 Installment Status
सर्वात आधी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी पण योजनेच्या (https://ladakibahin.maharashtra.gov.in/) अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
यानंतर तुम्हाला अर्ज लॉगिन यावर क्लिक करायचे आहे. आता तुमच्यासमोर लॉगिन पेज उघडेल.
लॉगिन पेजवर लॉगिन करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल. त्यानंतर लॉगिन या बटनावर क्लिक करा.
पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर तुम्हाला आधी केलेल्या अर्जावर क्लिक करावे लागेल.
ॲप्लिकेशन स्टेटसद्वारे महिला त्यांच्या अर्जाची स्थिती तपासू शकतात. अर्जाची स्थिती मंजूर झाल्यास महिलांना दहावा हप्ता मिळेल.
conclusion
आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दावा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच, या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र ठरणार आहेत आणि कोणत्या महिला पात्र ठरणार नाहीत याची देखील सविस्तर माहिती जाणून घेतली. यासोबतच, ज्या महिलांना मागील हप्त्याचे पैसे मिळाले नव्हते त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकार किती रुपये जमा करणार आहे हे या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला सविस्तर सांगितले आहे. आता ही महत्त्वाची माहिती तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा.
Majhi Ladki Bahin Yojana 10 Installment FAQ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा १०वा हप्ता कधी मिळणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 10 वा हप्ता 24 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये दोन टप्प्यांत वितरित करण्यात येणार आहे.